Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत याचं दिल्लीत निधन. |

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत याचं दिल्लीत निधन. |

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरीतील  प्रीमास रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.

कामत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून २००९ मध्ये निवडून आले होते. तत्पूर्वी उत्तर पूर्व मतदारसंघातून ते १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ मध्येही निवडून गेले होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचं वर्चस्व होतं.

पेशाने वकील असलेले कामत यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉची पदवी मिळवली. २००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये गुरुदास कामत यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचीही अतिरिक्त जबाबदारी होती.

मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्याच वर्षी त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता.

गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते. काँग्रेसनं त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या राज्यांची जबाबदारी सोपवली होती.

गेल्या वर्षी त्यांचं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत दोनदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments