Friday, August 8, 2025
HomeMain Newsनाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक...

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत t) यांनी उपस्थित केला. नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे  ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, याची मला कल्पना नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

नाणार प्रकल्पासंदर्भात पुनर्विचार करावा, असे पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या नाणारविषयी बदललेल्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. आजही नाणारमधील अनेक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस करावं, असे आव्हान विनायक राऊत यांनी दिले.

तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा स्पष्ट विरोध आहे, हे दिसत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments